Uncategorized
Trending

शारंगधर देशमुख काँग्रेस सोडणार ; हातात बांधणार शिंदेंचे शिवबंधन

दस्तावेजच्या बातमीवर शिक्कामोर्तब

कोल्हापूर शहराच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असणारे महानगरपालिका राजकारणातील काँग्रेसचे मोठे नेते, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख हे काँग्रेस सोडणार असल्याचे आज स्पष्ट झाले. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या माहितीत म्हणले आहे.

दरम्यान कोल्हापूर मधील काँग्रेस पक्षाचा एक दिग्गज नेता लवकरच काँग्रेस पक्षाची सोडचिट्टी घेणार असून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याबद्दलचे वृत्त दस्तावेजने कालच प्रसारित केले होते. आजच्या या घडामोडीनंतर या बातमीला पुष्टी मिळाली असून दस्तावेजच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

टीम दस्तावेज

दस्तावेज मीडिया हाऊस हे कोल्हापूरमधून कार्यरत असलेले एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. या माध्यमाची जडणघडण सिटीझन जर्नलिस्ट या जबाबदार नागरिकांच्या सहभागातून झाली असून, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर आणि प्रतिष्ठित पत्रकारांच्या अनुभवाचा लाभ या संस्थेला लाभलेला आहे. दस्तावेज मीडिया हाऊसचा मुख्य उद्देश लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत समाजात सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा संदेश पोहोचवणे हाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!