
कोल्हापूर प्रतिनिधी
गुरुवारी महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने राज्यातील तब्बल २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची ठाणे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली, त्यांच्या जागी योगेशकुमार गुप्ता हे आता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक असतील.
योगेशकुमार गुप्ता हे सध्या नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. प्रशासनात गुप्ता हे करड्या शिस्तीचे म्हणून ओळखले जातात, येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.