ब्रेकिंग न्यूज
Trending

निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन

मोठा लोकसंग्रह असणारा नेता कालवश

निपाणी प्रतिनिधी –

निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील मध्यरात्री के एल इ रुग्णालय बेळगाव या ठिकाणी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

निपाणीचे माजी आमदार आणि काँग्रेसचा तळागाळातील लोकसंपर्क असणारा चेहरा म्हणून काकासाहेब पाटील लोकप्रिय होते. काकासाहेब पाटील यांचे मूळ गाव निपाणी जवळचे वाळकी असून त्यांचे वडील शिक्षक होते.

गेले काही दिवस काकासाहेब पाटील यांना प्रकृती ठीक नसल्याने बेळगाव येथील के एल इ रुग्णालय या ठिकाणी ठेवण्यात आले होते. जवळपास 40 दिवस या ठिकाणी उपचार सुरू असलेल्या काकासाहेब पाटील यांची यादरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक येथल काँग्रेसच्या आणि इतर पक्षातील मान्यवर नेत्यांनी सुद्धा भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. मात्र आज मध्यरात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले.

टीम दस्तावेज

दस्तावेज मीडिया हाऊस हे कोल्हापूरमधून कार्यरत असलेले एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. या माध्यमाची जडणघडण सिटीझन जर्नलिस्ट या जबाबदार नागरिकांच्या सहभागातून झाली असून, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर आणि प्रतिष्ठित पत्रकारांच्या अनुभवाचा लाभ या संस्थेला लाभलेला आहे. दस्तावेज मीडिया हाऊसचा मुख्य उद्देश लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत समाजात सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा संदेश पोहोचवणे हाच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!