
मुंबई प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणामध्ये गोळाबेरीज करणारी अनेक समीकरणे रूढ होऊ पाहत असताना पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा मातब्बर नेता लवकरच काँग्रेसला रामराम करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजते आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री असणारे आणि काँग्रेसमध्ये प्रस्ताव असणारे हे नेते लवकरच राष्ट्रीय काँग्रेसला रामराम करून शिवसेना सिंधी गटात प्रवेश करणार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधली अनेक गणिते बदलणार आहेत एवढे मात्र नक्की.
सत्तेच्या समीकरणासाठी काँग्रेसला रामराम करणाऱ्या या माजी मंत्रिमहोदयांचे नाव सिद्धाराम म्हेत्रे असे असून त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस कडून सत्ता उपभोगली आहे.