ब्रेकिंग न्यूजशिक्षण
Trending

कोल्हापुरात २१ जूनला राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दोन ग्रंथांचे प्रकाशन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने होणार प्रकाशन सोहळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस लिखित “आर्किटेक्ट ऑफ सोशल जस्टिस डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सोसायटी” या इंग्रजी आणि “सामाजिक समतेचे सैद्धांतिक आधार : राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर परस्पर संबंध” या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, दि. 21 जून 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या ग्रंथात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा परस्पर संबंध आणि डॉ. आंबेडकर यांच्या भारतीय समाजातील योगदानाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. निर्मिती प्रकाशन आणि श्रावस्ती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी उपस्थित राहणार असून ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथील लेखक आणि विचारवंत केशव वाघमारे यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य सुरेश कांबळे असतील तर डॉ. प्रविण कोडोलीकर, सनी गोंधळी आणि अनिल म्हमाने यांची सन्माननीय उपस्थिती राहील. निर्मिती प्रकाशनच्या डॉ. शोभा चाळके आणि श्रावस्ती प्रकाशनच्या डॉ. मिनल राजहंस प्रकाशन समारंभाच्या निमंत्रक असून सदर समारंभ सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या विचारवंत, अभ्यासक आणि शाहू प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टीम दस्तावेज

दस्तावेज मीडिया हाऊस हे कोल्हापूरमधून कार्यरत असलेले एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. या माध्यमाची जडणघडण सिटीझन जर्नलिस्ट या जबाबदार नागरिकांच्या सहभागातून झाली असून, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर आणि प्रतिष्ठित पत्रकारांच्या अनुभवाचा लाभ या संस्थेला लाभलेला आहे. दस्तावेज मीडिया हाऊसचा मुख्य उद्देश लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत समाजात सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा संदेश पोहोचवणे हाच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!