अर्थकारण
Trending

मांगुरच्या कुराडे बंधूंचा आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी

काकडीचे विक्रमी उत्पादन

मांगुर प्रतिनिधी

 

निपाणी तालुक्यातील मांगुर येथील महेश कुराडे आणि राकेश कुराडे या बंधूंनी आपल्या एक एकर शेत जमिनीत केलेला आधुनिक शेतीचा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

 

मार्च २०२५ मध्ये या बंधूंनी आपल्या एक एकर शेत जमिनीत बेली जातीच्या सुधारित वाणाची काकडी लागवड केली. त्यानंतर पंचेचाळीस दिवसात विक्रमी उत्पादन काढले आहे. सदर पिकासाठी सरासरी १,३५, ००० खर्च आला असून आतापर्यंत साडे आठ लाखांचे उत्पादन मिळाले आहे. सध्या काकडी भाव ३५ रुपये असून साधारणपणे अजून १५ टन माल निघणे अपेक्षित आहे.

 

शेतीकडे आधुनिक व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास शेती फायदेशीर व्यवसाय ठरतो, हे या तरुणांनी दाखवून दिले आहे.

 

या शेतीप्रकल्पाचा व्हिडिओ पहायचा असेल तर खालील लिंक क्लिक करा.

टीम दस्तावेज

दस्तावेज मीडिया हाऊस हे कोल्हापूरमधून कार्यरत असलेले एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. या माध्यमाची जडणघडण सिटीझन जर्नलिस्ट या जबाबदार नागरिकांच्या सहभागातून झाली असून, पत्रकारिता क्षेत्रातील मातब्बर आणि प्रतिष्ठित पत्रकारांच्या अनुभवाचा लाभ या संस्थेला लाभलेला आहे. दस्तावेज मीडिया हाऊसचा मुख्य उद्देश लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत समाजात सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा संदेश पोहोचवणे हाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!